जल अभिषेक पूजा ही एक पवित्र अभिषेक पूजा विधी आहे, ज्यामध्ये भगवान लिंगराज यांच्या दैवी शिवलिंगावर जल (पाणी) अर्पण केले जाते. हिंदू परंपरेनुसार जल (पाणी) अत्यंत पवित्र आणि आध्यात्मिकदृष्ट्या शक्तिशाली मानले जाते, त्यामुळे शिव उपासनेत ते एक अत्यावश्यक घटक आहे. या पूजेमध्ये शिवलिंगावर पुष्प (फुले) अर्पण करण्याचाही समावेश असतो. फुले ही भक्ती, पवित्रता, आदरभाव आणि दैवी प्रेमाचे प्रतीक असून, ती अर्पण केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो, अशी श्रद्धा आहे. लिंगराज मंदिरात जल अभिषेक केवळ अनुभवी गुरुजींकडूनच, पारंपरिक वैदिक विधींचे काटेकोर पालन करून केला जातो.
खाली लिंगराज मंदिर येथील अभिषेकांसाठी पारंपरिकरित्या अनुभवी असलेल्या गुरुजींच्या प्रोफाइलची यादी दिली आहे. खालील पूजा बुकिंग फॉर्म भरून आपल्या पसंतीच्या कोणत्याही अभिषेक पूजेसाठी गुरुजी बुक करा. यशस्वी पेमेंटनंतर तुम्हाला गुरुजींची माहिती प्राप्त होईल.
लिंगराज मंदिर, भुवनेश्वर, ओडिशा. लिंगराज मंदिर येथे जलाभिषेक पूजा मंदिराच्या नियम व मार्गदर्शक तत्त्वांनुसार गर्भगृहात केली जाते. या व्यतिरिक्त इतर धार्मिक विधी, अभिषेक / रुद्राभिषेक सारख्या दिव्य विधींचा अनुभव घेण्यासाठी आणि मंदिरातील अनुभवी गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली पवित्र शिवलिंगाला स्पर्श करून आशीर्वाद मिळवण्यासाठी ऑनलाइन बुकिंग करा.
पूजेची वेळ सकाळी: ०६:०० ते ०९:३० ,दुपारी: ०२:०० ते ०४:००
विशेष कालावधी: ०९:०० ते ०२:०० (२५ डिसेंबर २०२५ – १५ जानेवारी २०२६) (सणांनुसार, गर्दी नुसार किंवा गुरुजींकडून मिळालेल्या सूचनेनुसार पूजा / दर्शनाच्या वेळा बदलू शकतात.)
सुमारे ४ ते ५ मिनिटे
गुरुजी दक्षिणा ₹१,२९७/- (यामध्ये गुरुजींचे मानधन / दक्षिणा आणि पूजा साहित्य समाविष्ट आहे)
(निवडलेल्या पूजा मोड म्हणजेच -ऑनलाईन / ऑफलाईन पूजा मोड नुसार दक्षिणा बदलेल)
जास्तीत जास्त २ प्रौढ व्यक्ती प्रति बुकिंग. ( अहिंदूंना मंदिरात प्रवेश निषिद्ध आहे)
सर्व पूजा साहित्य दक्षिणेमध्ये समाविष्ट आहे. (अतिरिक्त दक्षिणेची आवश्यकता नाही )
हिंदी व इंग्लिश मध्ये जलाभिषेक पूजेची माहिती घेण्यासाठी जलाभिषेक पूजा हिंदी व Jalabhishek English वर क्लिक करा .
लिंगराज मंदिर येथे हरिहरांचे आशीर्वाद प्राप्तीसाठी पंचामृत अभिषेक, रुद्र अभिषेक आणि दूध अभिषेक, लघुरुद्र यांशिवाय अनेक पवित्र पूजा आणि धार्मिक विधी संपन्न केले जातात. जगभरातून अनेक भाविकगण लिंगराज मंदिर, भुवनेश्वर येथे पवित्र अभिषेक पूजनाचा लाभ येणासाठी येतात व मनःशांती प्राप्त करत आनंदाने घराकडे परतात.
तुम्हाला लिंगराज मंदिर मधील अभिषेक पूजांबाबत काही प्रश्न आहेत का? पूजेसाठी गुरुजी बुकिंग बाबत माहिती, तसेच जवळपास भेट देण्याजोग्या ठिकाणांची संपूर्ण माहिती मिळवण्यासाठी कृपया आमच्या FAQ पेजला भेट द्या.
© 2025 Lingaraj Services. All rights reserved. Privacy Policy& Terms & ConditionsDesigned & Developed by Lingaraj Services .